|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » संशयितांच्या संख्येत 100 हून अधिकची वाढ

संशयितांच्या संख्येत 100 हून अधिकची वाढ 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. आतापर्यंत जिल्हय़ात आयसोलेशमध्ये असलेल्या रूग्णांची संख्या स्थिर म्हणजे   23 एवढी असली तरी होम क्वारंटाईनच्या संख्येत 100 हून अधिकने वाढ झाली आहे. सोमवारपर्यंत घरीच विलग केलेल्यांची संख्या  केलेल्या लोकांची संख्या 456 होती ती मंगळवारी सायंकाळपर्यंत 565 वर पोहचली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी व सीमबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून नियमभंग करणाऱयांविरोधात पोलीसांनी जोरदार मोहिम हाती घेतली आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थितीविषयी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात नमूद केले आहे की, संचारबंदीची अंमलबजावणी रत्नागिरी जिह्यात योग्य प्रकारे सुरु आहे. जिह्याच्या सीमा अन्य जिह्यातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिह्यातील रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांची संख्या 23 एवढी आहे. त्यात वाढ झालेली नाही. घरातच अलग करण्यात आलेल्या संशयित रुग्णांची संख्या 456 वरुन 565 इतकी वाढली आहे. पुणे-पिंपरी चिंचवड व मुंबई येथून रत्नागिरी जिह्यात आलेल्या लोकांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यावर वैद्यकीय विभाग लक्ष ठेवून राहणार आहे. जिल्हय़ात कळंबळी 2, दापोली 2, गुहागर 6 कामथे 2 रत्नागिरी 11 अशा एकूण 23 जणांवर आयसोलेशमध्ये उपचार सुरू असल्याचे वैद्यकिय अधिकाऱयांनी सांगितले.

बहुतांश उद्योग बंद

रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, झाडगाव, चिपळूण तालुक्यातील खेर्डी, दापोली येथील औद्योगिक क्षेत्रातील 908 पैकी 897 उद्योग बंद करण्यात आले आहेत. 11 उद्योग तांत्रिक कारणास्तव तसेच अत्यावश्यक सेवांशी संबंधित असल्याने सुरु ठेवण्यात आले आहेत. 22 उद्योगांनी अपरिहार्य कारणास्तव काम सुरु ठेवण्यासाठी परवानगी मागितली असून त्याबाबत आवश्यक निर्देश जिल्हा प्रशासन देणार आहेत. घरीच किराणा माल वितरण करण्यासाठी व्यापारी महासंघाला आवाहन करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या विशिष्ट वेळी दुकाने उघडण्याची मुभा दिली जाणार आहे.

मुंबईतून दुचाकीवरून आलेल्यांना पिटाळले

शासकीय आदेशांची पोलिसांकडून कडेकोट अंमलबजावणी सुरू असून  सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चारचाकी वाहनांना बंदी असलेल्या मुंबईतून दोन दुचाकींवरून चौघेजण रत्नागिरी शहरात येण्यासाठी निघाले होते. मंगळवारी  ते हातखंबा येथे आले असता पोलिसांनी त्याना अडवून चौकशी केली. आपण रत्नागिरीत गावी निघालो असून चारचाकीला बंदी असल्याने दुचाकीचा पर्याय स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी या दोन्ही गाडय़ांना प्रवेश नाकारत पुन्हा मुंबईला पिटाळले. दरम्यान, न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित रा†िहलेले एक वकिल जिह्यात परतत होते. मात्र त्यांची गाडी एमएच 08 असल्याने विनतीवरून त्यांना कशेडी घाटातून जिह्यात मोठय़ा मुश्कीलीने प्रवेश देण्यात आला.

Related posts: