|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाची येथे रस्त्यावर माती टाकून मार्ग बंद

बाची येथे रस्त्यावर माती टाकून मार्ग बंद 

वार्ताहर/ उचगाव

तुरमुरी-बाची ही गावे बेळगाव-वेंगुर्ला या मार्गावरील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर आहेत. यासाठी तुरमुरी ग्रा. पं.च्यावतीने कोरोनाबाबत मंगळवारी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन या शासनाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करण्यासाठी ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष नागनाथ जाधव, अध्यक्ष रामू खांडेकर, माजी अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली गावातून फिरून सूचना केल्या.

सदर गावे ही सीमेवर आहेत. परगावांहून येणाऱया व्यक्तिंची चौकशी, तपासणी केल्याशिवाय गावात घेऊ नये. तसेच अशी व्यक्ती गावात असेल तर त्यांनी घराबाहेर पडू नये, आरोग्य केंद्रात जाऊन वेळेत तपासणी करावी, अशा सूचना आशा कार्याकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रा. पं. सदस्य व पंच कमिटीकडून करण्यात येत होत्या.

बाची-शिनोळी रस्त्यावर चर खणून रस्ता बंद

बेळगाव-वेंगुर्ला या मार्गावर बाची-शिनोळी या फाटय़ावर रस्ता बंद पाडण्यासाठी व वाहतुकीला आळा घालण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेऊन मधोमध चर मारून रस्ता बंद पाडला.

तुरमुरी-बाची ही गावे महाराष्ट्राच्या सीमेवर वसल्याने मंगळवारी एडीसी यशोदा वंटगोडी, वडगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सुनीलकुमार, ता. पं. अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, तहसीलदार गुंडी गुंजीकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. 

Related posts: