|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिंडलगा गावची श्री महालक्ष्मी यात्रा रद्द

हिंडलगा गावची श्री महालक्ष्मी यात्रा रद्द 

प्रतिनिधी/हिंडलगा

हिंडलगा गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 28 एप्रिल रोजीपासून भरविण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव वाढला आहे. आपल्या देशासह जगात कोरोना विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. दि. 31 मे पर्यंत नागरिकांना एकत्र येण्यास बंदी आहे. तसेच या कालावधीत यात्रा, सभासमारंभ, विवाह सोहळा असे विविध कार्यक्रम आयोजित करू नये असा आदेश जिल्हा प्रशासनाने बजावला आहे. त्यामुळे हिंडलगा गावची श्री महालक्ष्मी देवी यात्रा भरविण्याबाबत श्री महालक्ष्मी यात्त्रोसव संघाची बैठक बुधवार दि. 25 मार्च रोजी आयोजित करण्यात आली.

यावेळी यात्रा भरविण्याबाबत चर्चा केली असता, सद्याच्या परिस्थितीत यात्रा आयोजित करणे अयोग्य आहे. केंद्र आणि राज्य शासनाने संचारबंदी घोषित केली आहे. आगामी एकवीस दिवस देशातील व्यवहार बंद ठेवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. महामारीला तोंड देण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने यात्रा भरविणे धोकादायक असल्याची सूचना सदस्यांनी केल्या. उदभवलेल्या परिस्थितीचा विचार करून श्री महालक्ष्मी देवी यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच पुढील तारीख यात्रोत्सव संघाच्यावतीने कळविण्यात येईल असे ठरविण्यात आले. बैठकीला संघाचे पदाधिकारी रमाकांत पावशे, राजू कुप्पेकर, प्रकाश बेळगुंदकर, श्रीकांत जाधव, महादेव बेळगुंदकर, परशराम कुडचीकर आदिसह सदस्य उपस्थित होते. एप्रिलमध्ये होणारी यात्रा रद्द झाली असून ग्रामस्थ आणि भाविकांनी याची नोंद घ्यावी तसेच सहकार्य करावे असे आवाहन यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे यांनी केले.

Related posts: