|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » संचारबंदीच्या काळातही निर्धारचे स्वच्छतेचे कार्य सुरूच

संचारबंदीच्या काळातही निर्धारचे स्वच्छतेचे कार्य सुरूच 

प्रतिनिधी/सांगली

कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या काळात ही निर्धार टीमचे अखंडपणे स्वच्छता अभियान सुरूच आहे. बुधवारी स्वच्छतेचा 695 वा दिवस होता.

संचारबंदीच्या काळात ही निर्धारतर्फे अखंड स्वच्छतेचा उपक्रम सुरूच आहे. 22 मार्च जनता कर्फ्यु दिवशीही त्यांनी स्वच्छतेचा उपक्रम राबविले. गेले 4 दिवस टिळक चौक,विष्णू घाट, सरकारी घाट आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिक व कागदांचा कचरा गोळा करून विलगीकरण करण्यात आले. त्यानंतर घाट परिसराचीही स्वच्छता करण्यात आली.

जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व टीमला योग्य ती दक्षता घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी निर्धारचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांना प्रथमेश खिलारे, सतिश कट्टीमणी यांच्यासह अमितभाऊ आठवले युवा मंचचे सचिन ठाणेकर, सूरज साबळे, विशाल साबळे, सचिन माने आदींचे नेहमीच विशेष सहकार्य लाभते.

Related posts: