|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » पुण्यात 24 तासांत 5 रुग्ण कोरोनामुक्त

पुण्यात 24 तासांत 5 रुग्ण कोरोनामुक्त 

ऑनलाईन टीम / पुणे :

एकीकडे जगभर कोरोनाने कहर केला असताना दुसरीकडे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात चोवीस तासांत 5 जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच 48 तासांत शहराच्या हद्दीत एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची भर पडली नाही, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधीलसह एक प्रवासी यांचा यात समावेश आहे. यातील दाम्पत्याचे दुसरे निगेटिव्ह रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा तर उरलेल्या तिघांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आले आहेत.

या संदर्भात महापौर मोहोळ म्हणाले, कोरोनाचे संकट मोठे असले तरी त्यावर मात करता येत आहे, हा विश्वास महत्त्चाचा आहे. यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत असून योग्य समन्वय आम्ही ठेवला आहे. कोरोनामुक्त होता येत असले, तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यकच आहे’

 

Related posts: