|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » सोशल डिस्टन्सिंगसाठी आता पेंडंट

सोशल डिस्टन्सिंगसाठी आता पेंडंट 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असणाऱया 1 मीटरच्या सोशल डिस्टन्सिंगसाठी पंजाबमधील अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने उपाय शोधला आहे.

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील प्रवीण कुमार दास या विद्यार्थ्याने ‘कवच’ नावाचे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण एखाद्या व्यक्तीच्या एक मीटर अंतराच्या सुरक्षित जागेत दुसरा कोणी आल्यास व्हायब्रेट होते. हे उपकरण गळय़ात एका एखाद्या

पेंडंटसारखे घालता येते. यात दर तीस मिनिटांनी हात धुण्यासाठी आठवण करून देणारा गजर आहे. याचबरोबर यात टेंपरेचर सेंसर असून, यातील सेंसर तुमचे तापमान वाढल्यास हा एसएमएस तुम्हाला पाठवेल पाठवेल.

हे कवच अतिशय कमी खर्चाचे असून, यात एलईडी, व्हायब्रेटर, कंट्रोलर, ह्यूमन बॉडी टेंपरेचर सेंसर, अल्ट्रासोनिक सेंसर स्विच आणि स्टोरेज कार्ड यांचा समावेश आहे. या उपकरणाचे व्यावसायिक उत्पादन घेतल्यास ते 500 रुपयांना पडणार आहे.

Related posts: