|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » विनाकारण भटकणाऱयांना सचिनचा घरी बसण्याचा सल्ला

विनाकारण भटकणाऱयांना सचिनचा घरी बसण्याचा सल्ला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लॉकडाऊन जारी करूनसुद्धा विनाकारण घराबाहेर पडून भटकणाऱया नागरिकांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटद्वारे एक संदेश दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याबाबत सचिनने आपल्या ट्विटमध्ये ‘मीदेखील एकवीस दिवस माझ्या कुटुंबासोबत घरात बसणार आहे. तुम्हीदेखील सरकारच्या विनंतीला मान द्या आणि घरातच थांबा,’ असे म्हटले आहे.

‘या कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी घरी बसणे हेच आपले मुख्य कर्तव्य आहे. त्यामुळे कृपया कोणीही घराबाहेर पडू नका,’ असे आवाहनही सचिनने जनतेला केले आहे.

 

Related posts: