|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोरोना : कोल्हापुरात शहरवासीय लपवतायत बाहेरील पाहुणे

कोरोना : कोल्हापुरात शहरवासीय लपवतायत बाहेरील पाहुणे 

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडून उपायोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशात संचारबंदी लागू केली असून जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईपुणे आणि अन्य शहरातून कोल्हापुरात येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापुरात आल्यानंतर हे लोक आपल्या नातेवाईक मित्राकडे बिनधास्त राहत आहेत. विशेषता झोपडपट्टी मध्ये हे प्रमाण अधिक आढळून येत आहे. नातेवाईक सुद्धा आलेल्या पाहुण्यांची कल्पना प्रशासनाला देत नसल्याचे दिसून येत आहे.

परिणामी संशयित रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे बाहेरून आलेल्या पाहुण्यांना घरात लपून ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम नंतर दिसून येण्याची शक्यता आहे. झोपडपट्टी सारख्या ठिकाणी या संसर्गजन्य आजाराची एकदा लागण झाल्यास भविष्यात त्याला आटोक्यात आणणे मुश्कील होणार आहे. गेल्या तीन दिवसात राजेंद्र नगर झोपडपट्टीत बाहेरून आलेले जवळपास पंधरा ते वीस जण आढळून आले आहेत. शेजारील लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शेतामध्ये दाखल केले. पण असे आणखी किती जण दाखल झाले आहेत आणि लपून ठेवले आहेत हे तपासण्याची गरज आहे. यासाठी झोपडपट्टीवर महापालिकेनं लक्ष केंद्रित करून कायमस्वरूपी पथके ठेवण्याची गरज सर्वसामान्य लोकातून व्यक्त केली जात आहे.

Related posts: