|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » अमेरिकेत कोरोनाचे 1000 हून अधिक बळी

अमेरिकेत कोरोनाचे 1000 हून अधिक बळी 

 ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. चीन आणि इटली नंतर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 68 हजार 572 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील पाच दिवसांत अमेरिकेत दहा हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील परिस्थितीही आता चिंताजनक होत चालली आहे. सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्याच्या यादीत चीन, इटलीनंतर अमेरिका तिसऱया स्थानावर आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून वॉशिंग्टन डीसी प्रशासनाने 24 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग, कामकाजांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

 कोरोनाच्या संसर्गामुळे 10 कोटीहून अधिक अमेरिकन सध्या लॉकडाऊनमध्ये आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर सध्या कोरोना संसर्गाचे केंद्र बनले आहे. तिथे मंगळवारपर्यंत तब्बल 30 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 285 जणांचा मृत्यू झाला आहे.

Related posts: