|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » कोरोना संकटात फेडररकडून गरजूंना सात कोटींची मदत

कोरोना संकटात फेडररकडून गरजूंना सात कोटींची मदत 

ऑनलाईन टीम / बर्न :

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्यासाठी टेनिस सम्राट व स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररदेखील पुढे आला आहे. त्याने सात कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे.

या संकटकाळात हातावर पोट असणाऱया कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून रॉजर फेडरर व त्याची पत्नी मिर्का यांनी सात कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. स्वित्झर्लंडमधील गरजूंना ही मदत दिली जाणार आहे.

याबद्दल बोलताना रॉजर फेडरर म्हणाला, की प्रत्येकासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. मी आणि माझी पत्नी मिर्का †िस्वत्झर्लंडमधील गरजूंसाठी 1 मिलियन स्वीस फ्रान्स (सात कोटी) देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुरुवात आहे. अजून अनेक जण गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येतील, अशी आशा आहे. आपण सर्व मिळून या संकटावर मात करू शकतो. मात्र यासाठी सर्वांनी घरात थांबले पाहिजे, सुरक्षित राहिले पाहिजे, अशी अपेक्षा फेडररने व्यक्त केली.

 

Related posts: