सदरचे ऍप हे युपीआय आंतरराष्ट्रीय ऍपमध्ये होणार सक्रिय ः अशी सेवा देणारे भारतामधील पहिले ऍप ठरले फोनपे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिनटेक प्रमुख फोनपे युपीआयच्या आधारे आता आंतरराष्ट्रीय पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे, भारतातील फोन पे वापरणारे ग्राहक परदेशात प्रवास करताना युपीआयचा वापर करुन आंतरराष्ट्रीय व्यापाऱयांना पेमेंट करू शकणार असल्याची माहिती आहे. सध्या या फीचरमध्ये ज्या देशांचा समावेश करण्यात येणार आहे, त्यामध्ये प्रामुख्याने यूएई, सिंगापूर, मॉरिशस, नेपाळ आणि भूतान यांचा समावेश राहणार आहे.
ग्राहकांना आता थेट त्यांच्या भारतीय बँकेतून विदेशी चलनांमध्ये पेमेंट करता येणार आहे. उदा ः ते आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डद्वारे करता येईल. फोनपेने एका निवेदनात असे म्हटले आहे. फिनटेक इंडस्ट्री एक्झिक्युटिव्हच्या मते, हे पाऊल मोठय़ा फॉरेक्स मार्केटचा एक भाग प्राप्त करण्याचा फोनपेचा प्रयत्न असल्याचे दिसते. ही अशी एक श्रेणी आहे जिथे पेमेंट ऍप्ससाठी अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी आहे.’
अन्य फिनटेक ऍप्सही क्रॉस-बॉर्डर पेमेंट लाँच करतील
काही इतर फिनटेक ऍप्स देखील येत्या काही महिन्यांत क्रॉस-बॉर्डर युपीआय सपोर्ट सादर करू शकतात. युपीआयने गेल्या महिन्यात 8 अब्जपेक्षा जास्त व्यवहार केले. परदेशी बाजारपेठेत युपीआय पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाऱयांना ऑनबोर्ड करणे ही भारताच्या एनपीसीआयसाठी एक प्रकारची चाचणी असेल, कारण व्यापाऱयांशिवाय, युपीआय वापरकर्ते पेमेंट करू शकणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मोबाईल पेमेंट ऍपने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशांतर्गत वापरकर्त्यांना सेवा देण्यास सुरुवात करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
क्रांती घडणार ः मुख्य तंत्रज्ञान अधिकारी
कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राहुल चारी म्हणाले, ‘गेल्या 6 वर्षांत, आम्ही संपूर्ण भारतभर युपीआय पेमेंटच्या क्रांतीचा अनुभव घेतला आहे. उर्वरित जगालाही आता युपीआयचा अनुभव देण्याच्या दिशेने युपीआय इंटरनॅशनल हे पहिले मोठे पाऊल आहे.’ असेही चारी म्हणाले. त्यामुळे हे फिचर लाँच करणे मोठे गेम चेंजर सिद्ध होईल.