बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्यावतीने मराठा मंदिरला छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट देण्यात आले. पुणे येथील चित्रकार मिलिंद शिंपी यांनी हे तैलचित्र रेखाटले आहे. मराठा मंदिरच्या मुख्य हॉलमध्ये हे तैलचित्र लावले जाणार आहे. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, शिवाजी हंगिरकर, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, लक्ष्मणराव सैनुचे, नागेश तरळे, मदन बामणे, सुहास किल्लेकर यांच्या उपस्थितीत ते देण्यात आले. यावेळी शहापूर विभाग म. ए. समितीचे शिवाजी हावळाण्णाचे, सुधीर नेसरीकर, राजाराम मजुकर, सुनील बोकडे, बाळू करळे, अभिजीत मजुकर, रणजित हावळाण्णाचे, शशिकांत पास्टे, गजानन शहापूरकर, कल्लाप्पा हंडे, सतीश गावडोजी, परशराम शिंदोळकर, राजकुमार बोकडे, रवि जाधव, राजू मजुकर, परशराम कुंडेकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleफेम फिएस्टा उत्सवाची थाटात सांगता
Next Article ठाकरे, शिंदेंसाठी सध्याचा काळ कसोशीचा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.