शॉर्टसर्किटमुळे आग : सर्व साहित्य खाक
प्रतिनिधी /खानापूर
नंदगड बाजारपेठेतील ओम फोटो स्टुडिओला शॉर्टसर्किटमुळे आग लागून स्टुडिओतील सर्व साहित्य जळून खाक झाले. स्टुडिओचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. वेळीच शेजाऱयांनी प्रसंगावधान बाळगून आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नंदगड बाजारपेठेतील बसवराज कापसे यांच्या घरी माणिक कुरिया यांचा काही वर्षापासून ओम फोटो स्टुडिओ सुरू होता. या स्टुडिओमध्ये 8 कॉम्प्युटर, 4 कॅमेरा, एक व्हिडिओ शूटिंग कॅमेरा, दोन बॅटऱया, एक इनव्हर्टर, दोन झेरॉक्स मशीन, दोन कलर फोटो मशीन यासह इतर सायबर व स्टुडिओसाठी लागणारे साहित्य व फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात कुरीया यांचे दहा लाखाचे नुकसान झाले आहे.
पहाटे 4 वाजता शेजारी असलेले विश्वजित चव्हाण, गजानन चव्हाण यांना आग लागल्याचे समजले. विश्वजित चव्हाण यांनी आपल्या घरावरुन आग लागलेल्या ठिकाणी उडी मारुन पत्रे खुले करून सिंटेक्स टाकीतील पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. चव्हाण तसेच शेजाऱयांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.