संकेश्वर पोलिसांकडून चौघांना अटक : कार, दुचाकी, 8 हजाराची रोकड, तीन मोबाईल संच जप्त
संकेश्वर : बेकायदा गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर संकेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत चौघा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून 1 किलो 600 ग्रॅम गांजा जप्त केला. याबरोबरच संशयितांकडून 8 हजारची रोकड, मोबाईल संच व कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई कणगलानजीक राष्ट्रीय महामार्गावरील उ•ाण पुलाजवळ करण्यात आली आहे. ताजीब अब्दुलरजाक मुल्ला (वय 23, रा. घटप्रभा, ता. गोकाक), ताजीर बस्तवाड (वय 24, रा. कणगला, ता. हुक्केरी), सोहीलअहम्मद नजीरअहम्मद हुबळीकर (वय 33, रा. रामनगर, धारवाड) व मंजुनाथ चिदानंद कपलीकर (वय 31, रा. धारवाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, गेल्या कांही दिवसापासून मादक पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरू होती. दरम्यान खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे संकेश्वर पोलिसांनी संशयितांसह गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत 1 किलो 600 ग्रॅम गांजा, 8 हजाराची रोकड, 3 मोबाईल संच, कार व दुचाकी जप्त केली. संशयितांवर गुन्हा दाखल करून संकेश्वर न्यायालयासमोर हजर कऊन त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. सदर कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख व गोकाक विभागाचे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्निगीरी, बी. के. नांगनूरे, एस. एम. एकसंबी, एन. बी. घस्ती. व्ही. गुलकुंद, एम. एम. जंबगी, बी. एस. कपरट्टी, एम. जी. दादामलीक यांनी केली.
युवकांचा सहभाग चिंतनीय
वाढती बेरोजगारी, कौटुंबिक कलह, वाढती व्यवसाधिनता व झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासामुळे अनेक युवक गुन्हेगारी मार्गाला लागले आहेत. यातून आपले आयुष्य दिशाहिन करत आहेत. अशा प्रकारामध्ये बहुतांशी युवक हे 20 ते 30 वयोगटातील असल्याचे दिसून येत आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.