बोट मालक अविनाश शिंदे व गौरेश साळगावकर यांची माहिती : मांडवी सोसायटीच्या चेअरमनकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन : अवमान याचिका दाखल करणार
प्रतिनिधी / म्हापसा
मासळी बोट मालक गौरीश साळगावकर यांना सर्व सुविधा पुरविण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश देऊनही मांडवी सहकारी सोसायटी त्यांना सुविधा देण्यास नकार देत आहे. त्यामुळे साळगावकर यांच्या समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मांडवी सहकारी सोसायटीच्या चेअरमनांकडून ही सातवणूक सुरू आहे. दरम्यान, येथील एक ट्रॉलर्समधील सुमारे दीड टन मासळी कुजली असून अद्याप आणखी दीड टन मासळी बाहेर काढण्याचे बाकी आहे. मासळी कुजल्यामुळे किडे पडून दुर्गंधी परिसरात दुर्गंधी पसरली आहे, अशी माहिती मालीम जेटीवर ट्रॉलर मालक गौरीश साळगावकर व अविनाश शिंदे यांनी पत्रकार परिषेद दिली. यावेळी कुजलेली मासळीही पत्रकारांना त्यांनी दाखविली.
गेल्या दोन वर्षांपूर्वी साळगावकर यांनी नवीन बोट खरेदी केली होती मात्र मांडवी सोसायटीने त्यांना सहकार्य केले नाही. याबाबत साळगावकर यांनी सर्व सोपस्कार पूर्ण करून सोसायटीशी पत्रव्यवहार केला. मात्र येथील सोसायटीचे अध्यक्षांनी दुर्लक्ष केले असून आपण मंत्री आमदार संचालकांना तसेच न्यायालयालाही भीक घालत नाही, असे सांगतात. पाणीही देण्यास टाळटाळ केली जात असून याचा आपल्याला मनस्ताप झाल्याचे साळगावकर यांनी यावेळी सांगितले.
मासळीला दुर्गंधी
चार दिवसांपासून मासळी भरलेली बोट जेटीला लागली आहे, मात्र गौरेश साळगावकर यांच्या बोटीतील मासे कुणीही घेत नाही. बोटीवरून आलेले मासे इतरत्र आयात निर्यात केले जातात. मात्र साळगावकर व त्याना सहकार्य करणारे अविनाश शंदे यांना वगळता इतर सर्वांची मासळीची उचल केली जाते. त्यामुळे हे मासे कुजून किडे पडून दुर्गंधी सुटली आहे.
साळगावकर यांनी दोन वर्षांपूर्वी नवीन बोट खरेदी केली होती. सर्व सोपस्कार करून बोटीला मालीम जेटीवर परवानगी मागितली. मात्र सोयसाटीने परवानगी नाकारली. याविरोधात साळगावकर यांनी संचालकांकडे धाव घेतली. तेथून परवानगी घेऊन कागदपत्रे सोसायटीकडे सादर केली. तरी सोसायटीने त्यांनी डिझेल पेट्रोल देण बंद केले. फिशिंग कंपनीलाही लेखी कळवून गौरीश साळगावकर यांचा माल करू नका, असे सांगितले. सरकार स्वयंरोजगार करा असे सांगते. तर दुसरीकडे मात्र सोसायटीचे चेअरमन धंदाच करू देत नाहीत, असा आरोप साळगावकर व शिंदे यांनी यावेळी केला.
महिन्याभरापासून बोटीतील मासे कुजुण्याचा प्रकार
सोसायटीच्या चेअरमन विरोधात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊन तेथे आमची बाजू मांडली. न्यायालयाने परवानगी देण्याचे आदेश दिले. महिन्याभरापासून आमच्या बोटीतील मासळी कुजून जात आहे. यापुढे आमचे मासे न घेतल्यास ही मासळी मच्छीमार मंत्र्यांच्या घरासमोर घेऊन बसण्याचा इशारा यावेळी साळगावकर यांनी दिला.
मच्छीमार मंत्र्यांचा आदेशही धुडकावला
मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांचीही भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली यावर मंत्र्यांनी सोसायटीच्या चेअरमनना संबंधित बोट मालकांना सर्व सुविधा पुरवा व त्रास देऊन नका, असे बजावले आहे. मात्र त्यांनी आपल्याला मंत्री आमदार, संचालक कोण लागत नाही, असे सांगून मंत्र्यांचा आदेश धुडकावून लावला, अशी माहिती त्यांनी दिली.
लाखो रुपयांची गुंतवणूक पडून
बोटी उभ्या असल्याने कामगारही आता घरी जाऊ लागले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही न्यायालयातही धाव घेतली मात्र आमच्या पदरी निराशाचा पडली. आमचे लाखो रुपयांची गुंतवणूक पडून राहिली, उच्च न्यायालयाचा आदेशही धुडकावल्यामुळे मांडवी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे साळगावकर व शिंदे यांनी सांगितले.
सोसायटीचा व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर
मांडवी सोसायटीमधून पूर्णपणे बेकायदेशीर व्यवहार सुरू आहे. येथे मासे कापण्यासाठी बाहेर शेड उभारली आहे. तेथे व्यवसाय करणाऱयांकडून महिन्याकाठ ाr 60 हजार रुपये आकारले जातात. मात्रे ते कुणाच्या खिशात जातात. हे पैसे वास्तविक सरकारी तिजोरीत जाणे आवश्यक आहे. पंचायतीची त्याला परवानगी नाही. हा सगळा प्रकार बेकायदेशीर असल्याच आरोप बोटमालक साळगावकर व शिंदे यांनी केला आहे.