सातारा शहर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
जबरी चोरी, दरोडा या प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला एक वर्षाकरीता जिह्यातून तडीपार करण्यात आले होते. हा आरोपी शहरात फिरताना आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करून त्याला अटक करण्यात आली आहे. सुश्रीत तानाजी सावंत (रा. सदरबझार सातारा) असे त्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार परिसरात शुक्रवारी पहाटे तडीपार आरोपी सुश्रीत सावंत हा फिरत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाली. त्यांनी डी. बी. पथकाला त्या आरोपी सुश्रीतला पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने परिसरात शोधमोहिम राबवून त्याला ताब्यात घेतले. त्याने तडीपार आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभर साबळे, पोलीस नाईक विक्रम माने, पोलीस कॉन्टेबल संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग सागर गायकवाड यांनी केली.
तडीपार आरोपी दिसल्यास संपर्क करा
सातारा जिह्यातून जयसिंग जनार्दन कांबळे(वय 34, रा. प्रतापसिंहनगर खेड), अजय देवराम राठोड (वय 29), शुभम अजय जाधव(वय 22), ऋतिक/बाबा अजय जाधव(वय 19), गणेश विलास चव्हाण(वय 20, सर्व रा. लक्ष्मीटेकडी सदरबझार) यांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. यामुळे हे शहरात फिरताना आढळून आल्यास नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क करून यांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.