आर्थिक वर्ष 2023 पर्यंत होणार भरती : उद्योग साधतोय 20 ते 30 टक्के विकास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय गेमिंग उद्योग आगामी काळामध्ये 20 ते 30 टक्के इतका विकसित होणार आहे. या अनुषंगाने आर्थिक वर्ष 2023 मध्ये या उद्योगात एक लाख जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये रोजगारासाठी गेमिंग उद्योग हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
सदरच्या क्षेत्रामध्ये सध्याला 50 हजारहून अधिक जण काम करत असून पैकी 30 टक्के प्रोग्रॅमर्स व डेव्हलपर्स म्हणून कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष 2019 मध्ये 7 हजार 37 कोटी रुपयांची असणारी उलाढाल आर्थिक वर्ष 2022 मध्ये 14 हजार 300 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
38 हजार कोटींची होणार उलाढाल
आर्थिक वर्ष 2026 पर्यंत गेमिंग उद्योगाचे क्षेत्र 38 हजार 97 कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचू शकते, अशी माहिती टिम लिझ यांनी नुकतीच दिली आहे. वापरकर्त्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे गेमिंग उद्योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी या क्षेत्रामध्ये नव्याने रोजगाराच्या संधी पुढे येऊ लागल्या आहेत. हे क्षेत्र इतर सर्व क्षेत्रांना घेऊन काम करत असल्याने कर्मचाऱयांची मागणी अधिक नोंदवत आहे. नियमांच्या संदर्भातील वेळोवेळी होणाऱया बदलांचा अडथळा जरी असला तरी गेमिंग उद्योग आपली वाटचाल यशाच्या दिशेने चालू ठेवणार आहे. त्यामुळे आगामी काळात एक लाखहून अधिक जणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार असल्याचे टिम लिझ फर्मने म्हटले आहे.
अपग्रॅड 1400 जणांची करणार भरती
दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रामधील
अपग्रॅड यांनी मार्च 2023 पर्यंत चौदाशे नव्या उमेदवारांना आपल्या कंपनीमध्ये सामावून घेणार असल्याचे म्हटले आहे. कंपनी कार्यालयीन गाळय़ांचा विस्तार करणार आहे.
विदेशी गुंतवणूक होणार
दुसरीकडे या उद्योगात 780 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूकही आगामी 2023 आर्थिक वर्षामध्ये होण्याची शक्मयता सांगितली जात आहे. गेमिंग उद्योगामध्ये भारताची कामगिरीही दमदार राहिली आहे. एकंदर जगामध्ये पाहता चीन हा पहिल्या क्रमांकावर तर भारत हा दुसऱया क्रमांकावर या उद्योगामध्ये कार्यरत आहे. 48 कोटी लोक या उद्योगामध्ये सक्रिय असल्याचेही सांगितले जाते.