अमेरिकेतील संशोधकांनी एक औषध विकसित केले असून ते 300 विषाणूंवर (सुपरबग्ज) रामबाण उपाय ठरणार आहे. या औषधाचे नाव फेबियामायसिन असे असून त्याच्यावरील प्रारंभिक परीक्षणे अत्यंत यशस्वी ठरली असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. जे सुक्ष्म जीव (बॅक्टेरिया) सर्वसामान्य औषधांना दाद देत नाही. त्यांचा विनाश या औषधामुळे लिलया होऊ शकतो.
विषाणूराज किंवा सुपरबग्ज हा एक प्रकारचा बॅक्टेरिया व्हायरस किंवा बुरशी असते. हे सुक्ष्मजीव प्रचलित विषाणूविरोधी औषधांना दाद देईन असे झाले आहे. या सुक्ष्मजीवांमध्ये झपाटय़ाने उत्क्रांती होत असून त्यामुळे औषधांचा उपयोग होत नाहिसा झाला आहे. सर्वसाधारण विषाणूचा क्रोमोसोम विषाणूविरोधी औषधांचा रेणू प्रभावहीन करण्यासाठी करत असतो. या प्रयत्नातून विषाणूची उत्क्रांती होत असते.
अमेरिकेत तयार झालेल्या या औषधाचे 14 प्रकार विकसित करण्यात आले आहेत. प्रारंभी त्यांचे उंदरांवर प्रयोग करण्यात आले. यातून उंदरांचे असाध्य रोग बरे होतात असे दिसून आले. त्यामुळे नंतर व्यापक प्रमाणात परीक्षणे करण्यात आली आहेत. हे औषध प्रभावीपणे कोणत्याही प्रकारच्या विषाणूचा नाश करू शकते असे स्पष्ट झाले आहे. मात्र अद्यापही वेगवेगळी निरीक्षणे सुरू असून मानवी शरीरावर याचे दुष्परिणाम होतात का? याचाही अभ्यास सुरू आहे. येत्या 4 ते 5 वर्षांत सर्व प्रयोग आणि परीक्षणे सकारात्मक आल्यास या औषधाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादनही केले जाऊ शकते. अद्याप हे औषध बाल्यावस्थेत असले तरी त्याची क्षमता भविष्यकाळ उज्ज्वल करणारी आहे. हे निश्चितपणे मानले जाते.
सुपरबग्जचा धोका जगभरात वाढीला लागला आहे. या संसर्गामुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू होतो. या औषधामुळे निम्म्याहून अधिक मृत्यू टाळता येतील आणि लोकांच्या निरोगी आयुष्याची सुनिश्चिती करता येईल. सध्या या औषधावर अनेक संशोधकांनी लक्ष केंद्रीत केले असून येत्या एक वर्षात प्रगतीचा अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे.