पणजी : मेरशी येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. काल गुऊवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला असून ओल्ड गोवा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. गोमेकॉत शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शवचिकित्सा अहवाल आज शुक्रावारी मिळणार आहे, अशी माहिती ओल्ड गोवा पा]िलसांनी दिली. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव प्रमोद तुकाराम नाईक (57, रा. कार्मिभाट मेरशी) असे आहे. बुधवारी रात्री प्रमोद गणपती विसर्जनासाठी गेला होता. गणपती डोक्यावर घेऊन पाण्यात गेला तो परत आलाच नाही. गुऊवारी पहाटे पर्यंत त्याचा शोध करण्यात आला, मात्र तो मिळाला नव्हता. गुऊवारी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला. ओल्ड गोवा पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह गोमेकॉत पाठविला, शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, गणपती घेऊन पाण्यात उतरल्यानंतर प्रमोद याला हृदयाचा झटका आला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्याक्त केला आहे. प्रमोदचा मृतदेहा सापडला तेव्हा तो गणपती धरलेल्या स्थितीत होता. हातात गणपतीची मूर्ती नव्हती मात्र त्याचे हात तशाच स्थिती होते. बुडून मृत्यू झाला असता तर बुडताना त्यांनी स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला असता आणि त्याच्या हातांची स्थिती वेगळी झाली असती असे पोलासंनी सांगितले. मयेत प्रमोद नाईक यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली तसचे भाऊ भावजय पुतण्या असा परिवार आहे.
Previous Articleओटवणेत पल्सर टू ट्वेंटी दुचाकी आगीत भस्मसात
Next Article काणकात तळ्यात बुडताना दोघांना वाचविले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.