वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेक कंपनी वनप्लसकडून लवकरच आपला पहिला फोल्डेबल फोन जागतिक बाजारपेठेसोबत भारतातही सादर करण्यात येणार आहे. कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोनला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबत जोडले आहे आणि त्याला वनप्लसचा पुढचा टप्पा राहणार असल्याचेही म्हटले आहे. वनप्लसने फोनच्या अनेक फोटोंसह एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
व्हिडीओ फोल्ड करण्यायोग्य फोनप्रमाणे कागद उघडताना आणि बंद होताना दाखवतो. मीडिया अहवालानुसार हा फोन वनप्लस ओपन या नावाने सादर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. मात्र फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशनबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच स्मार्टफोन्सच्या अपेक्षित वैशिष्ट्यांसह विविध माहिती समोर आली आहे.
वनप्लस ओपन : अपेक्षित तपशील
डिस्प्ले : वनप्लस ओपनमध्ये 120 एचझेड रिफ्रेश रेटसह दोन अमोलेड डिस्प्ले राहणार आहे.
हार्डवेअर व सॉफ्टवेअर : फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील पॅनलमध्ये 48 एमपी, 48 एमपी, 64 एमपी इतक्या क्षमतेचा ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. तसेच बॅटरीची स्थिती पाहिल्यास यामध्ये वनप्लस ओपनमध्ये 100 डब्लू फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,800 एमएएच बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
भारतात या फोल्डेबलची किंमत ही 1.10 लाख ते 1.20 लाख रुपयाच्या दरम्यान असेल.