उमेदवार प्रियांका जारकीहोळी : रायबाग शहरासह परिसरात प्रचार
बेळगाव : भाजपने केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे अशा पक्षावर मतदारांनी विश्वास ठेवू नये. दिलेले आश्वासन पाळून गोरगरिबांच्या कल्याणासाठी गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या काँग्रेसला मतदान करून चिकोडी लोकसभा मतदारसंघातून निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. रायबाग शहरासह परिसरात प्रचार करून प्रियांका जारकीहोळी बोलत होत्या. काँग्रेसने गोरगरिबांची साथ दिली आहे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी योजना राबविल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांची पूर्तता केली आहे. सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाकडून राज्यात विकासकामे राबविली जात आहेत. यासाठी केंद्रात काँग्रेस सत्तेत येण्यास मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यासह शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मदत केली आहे. कोरोना काळातही फौंडेशनकडून मदत दिली आहे. यापुढेही ही मदत कायम असणार आहे. काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून मतदारांनी आशीर्वाद द्यावा. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ दिली आहे त्याचप्रमाणे या निवडणुकीतही मतदान करून पक्षाला अधिक बळकट करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हास्य कलाकार लपंग राजा, जानपद कलाकार मल्लू निंपनाळ यांनी प्रियांका जारकीहोळी यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महावीर मोहिते, सिद्धारुढ बडगर, रोहिणी पाटील, शिवू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.