रेनो 10 प्रो प्लस इंडस्ट्रीचा सर्वात पातळ पेरीस्कॉप कॅमेरा फोन : किंमत 54 हजार रुपये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओप्पो इंडियाने 5 जी स्मार्टफोनची नवीन आावृत्ती रेनो 10 ही भारतीय बाजारात सादर केली आहे. यामध्ये 3 स्मार्टफोन सादर केले आहेत. यामध्ये ओप्पो रेनो 10, ओप्पो रेनो 10 प्रो आणि ओप्पो रेनो 10 प्रो प्लस याचा यामध्ये समावेश असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनीने दावा केला आहे की, ओप्पो रेनो 10 प्रो प्लस इंडस्ट्रीजचा स्मार्टफोन आहे. ऑप्टिल इमेज स्टेबिलायजेशन टेक्नालॉजीचा 64 एमपी टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा दिला आहे. यासोबतच ही सर्वाधिक पातळ आणि हलका पेरिस्कोप कॅमेरा फोनही दिलेला आहे.
डिस्प्ले : रेनो 10 प्रो प्लसमध्ये 2772 ते 1240 पिक्सल रिझोल्यूशन 6.74 इंच पूर्ण एचडी आहे.
प्रोसेसर आणि ओएस : प्रोसेसर आणि ओएस मध्ये फोनमध्ये 4 नॅनोमीटर फ्रेब्रिकेशन्सवर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस फर्स्ट जनरेशन ऑक्टाकोर प्रोसस दिले आहे. जे 1.8 गीगाहर्ट 3 गीगाहर्टचा क्लॉक स्पीडवर रन आहे.
रॅम आणि स्टोरेज : ओप्पो रेनो 10 प्रो प्लस 5 जी मध्ये 12 जीबी रॅम व 265 जीबी मेमरी दिली आहे.
कॅमेरा : फोनच्या बँक रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. हे ओआयएस तंत्रज्ञानाद्वारे 50 एमपी चा प्रायमरी सेंसर दिला आहे.
बॅटरी : पॉवर बॅक साठी फोनमध्ये 4,700 एमएएच चा डब्बल सेल बॅटरी दिली आहे. जी 4 वर्षांच्या ड्युरेबिलिटीसोबत येणार आहे.