तरुणभारत ऑनलाइन टीम
चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा यंदा पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाला सर्वाधिक ६ पुरस्कार मिळाले आहेत. ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत द समर ऑफ सोलने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही.
द अकॅडमी’ या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या पुरस्कारांची माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ड्यून चित्रपट सर्वाधिक चर्चेत राहिला. या चित्रपटाला ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी तब्बल १० नामांकनं मिळाली होती. ड्यून या चित्रपटाचं दिग्दर्शन डेनिस विलेन्यूवे या प्रसिद्ध दिग्दर्शकानं केलं आहे