वार्ताहर / धामणे
विठूनामाच्या जयघोषात आणि टाळमृदंगाच्या गजरात वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर-धामणे ते पंढरपूर पायी दिंडीचे 6 व्या दिवशी गुऊवारी महाराष्ट्रात आगमन झाले.
दिंडीचे म्हैशाळ येथे आगमण होताच येथील प्रसिद्ध के मार्टचे मालक प्रकाश थोरवत काळे व त्यांचे बंधू रमेश काळे यांनी दिंडीचे स्वागत केले. दि. 17 पासून येळळ्tर येथून या दिंडीची सुऊवात झाली. गुऊवारी सकाळी 6 वाजता शिरगुप्पीहून महाराष्ट्रात दुपारी 12 वाजता म्हैशाळ येथे या दिंडीचे आगमन होताच प्रकाश व रमेश काळे यांनी दिंडीचे पुष्पवृष्टी करून व आरती ओवाळून स्वागत केले.
दुपारी 1 वाजता काळे बंधूच्यावतीने दिंडीतील वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप केले. विश्रांतीनंतर दुपारी 3 वाजता दिंडी पुढे मार्गस्थ झाली. दिंडीचालक हभप मारुती सांबरेकर महाराज, दिंडी अध्यक्ष बाळू केरवाडकर, अजित पाटील, अजित सांबरेकर, रविंद्र पाटील, वारकरी मोहन खांबले, दीपक पाटील, भरमा डोंगरे, पुन्नाप्पा पाटील, सिद्राय जाधव आदीसह महिला दिंडीत सहभागी झाल्या आहेत.