स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदींच्या नावावर नवी कामगिरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय वायुदलाच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी यांनी अलिकडेच विदेशातील हवाई युद्धाभ्यासात भाग घेतला होता. लढाऊ विमानांचे सारथ्य करणे रोमांचक असून वायुदलात स्वतःची कारकीर्द घडवू पाहणाऱया तरुणाईसाठी अनंत आकाश खुले असल्याचे अवनी यांनी रविवारी म्हटले आहे.
12-26 जानेवारीपर्यंत जपानच्या एअर सेल्फ डिफेन्स फोर्ससोबत जपानच्या हयाकुरी वायुतळावर 16 दिवसांचा विशाल हवाई युद्धाभ्यास पार पडला होता. यात सामील भारतीय वायुदलाच्या पथकात एसयू-30 एमकेआयच्या वैमानिक अवनी चतुर्वेदी यांचा समावेश होता.
विदेशी वायुदलांसोबत हवाई युद्धाभ्यास करणे नेहमीच एक चांगला अनुभव असतो. आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासात सामील होण्याचा हा माझा पहिला अनुभव असल्याने हा माझ्यासाठी अत्यंत विशेष होता. माझ्यासाठी महान संधी आणि शिकण्याचा हा आनंददायी अनुभव आहे. या युद्धाभ्यासाने आम्हाला परस्परांपासून शिकण्याची संधी दिल्याचे अवनी यांनी म्हटले आहे.
कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या अवनी यांच्यासह तीन महिला लढाऊ वैमानिकांना जून 2016 मध्ये वायुदलात सामील करण्यात आले होते. लढाऊ वैमानिकांमध्ये अवनी यांच्यासाब्sात भावना कांत तसेच मोहाना सिंह या महिलांचा समावेश आहे.