Vengurle taluka level science replication-
वेंगुर्ले तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात वैज्ञानिक प्रतिकुतीमध्ये प्राथमिक गटात जि. प. शाळा परूळे नं. 3 ने व माध्यमिक गटात मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी ने प्रथम क्रमांक पटकावला. विज्ञान नाट्यत्सवात माध्यमिक गटात वेतोरे हायस्कूल ने प्रथम क्रमांक पटकावला. या विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांना गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, गट शिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी भाकरे, मदर तेरेसा चे मुख्याध्यापक डिसोजा, परिक्षक सारंग, सणस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
वेंगुर्ला / प्रतिनिधी