सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
वार्ताहर /मांजरी
अंकली ते चिकोडी दरम्यान असलेल्या राज्य महामार्गावरून हाऊगेरी येथून चिकोडीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कोरड्या कालव्यामध्ये पडली. या अपघातात बसमधील काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सुदैवाने कालवा कोरडा असल्यामुळे कोणताही मोठा अनर्थ घडला नाही.
राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक केए 23 एफ 690 ही बस प्रवाशांना घेऊन हाऊगेरी येथून चिकोडीकडे जात होती. बस अंकली-चिकोडी राज्य महामार्गावरील बसनाळ ग•s येथे आली असता बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस कालव्यामध्ये पडली. यामुळे बसमधील काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.