राज्यस्तरीय सबज्युनियर-ज्युनियर जलतरण स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक जलतरण संघटना व एनआरजी केएलई युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सबज्युनियर, ज्युनियर जलतरण स्पर्धेत पहिल्या दिवशी पवन धनंजय, श्रीयन, दक्षण एस., मीनाक्षी मेनन यांनी विजेतेपद पटकाविले. बसवनगुडी ऍक्वेटीक सेंटर बेंगळूरच्या जलतरणपटूंनी पहिला दिवस गाजविला.
सुवर्ण जेएनएमसी आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर व ज्युनियर जलतरण स्पर्धा पहिला दिवस ः 1500 मी. पुरुष फ्रिस्टाईल-1) पवन धनंजय बसवनगुडी ऍक्वेटीक सेंटर, 2) अमोघ आनंद वेंकटेश बसवनगुडी, 3) निलेशदास डॉल्फिन ऍक्विट.
1500 मी. फ्रिस्टाईल, मुली-1) सेरिन बसवनगुडी ऍक्विट, 2) रितीका बी. एम. बसवनगुडी, 3) अदिती एम. बसवणगुडी. 1500 मीटर फ्रिस्टाईल मुले 1) दक्षण एस. बसवणगुडी, 2) दर्शन एस. बसवणगुडी, 3) आतिश किरण ओईल्टी बसवणगुडी. मुलींचा गट-1) मीनाक्षी मेनन बसवनगुडी
ऍक्वेटीक, 2) साबा सुहानन ग्लोबल स्विम सेंटर, 3) श्री चिराणी तुमू ग्लोबल स्विम यांनी पहिल्या दिवशी विजेतेपद पटकाविले. तीन दिवस चालणाऱया या स्पर्धेत एकूण 46 हून अधिक प्रकार घेण्यात येणार आहेत.