आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याहस्ते देवीला श्रीफळ अर्पण
पेडणे : गोवा पर्यटन खाते, गोवा सरकार आणि पेडणे तालुका शिमगोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 14 आणि 15 रोजी पेडणे शहरामध्ये शिमगोत्सव होणार आहे. शिमगोत्सव मिरवणूक 14 रोजी आयोजित केलेली आहे. हा शिमगोत्सव यशस्वी व्हावा आणि कुठेच अडथळा आडकाठी येऊ नये यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष तथा पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली पेडणे येथील ग्रामदेवता श्री देवी भगवती आणि श्री देव रवळनाथ यांना श्रीफळ ठेवून शुभारंभ करण्यात आला आणि आशीर्वाद घेतले. यावेळी आयोजन समितीचे निमंत्रक माधव सिनाई देसाई, मोपा सरपंच सुबोध महाले, सरचिटणीस देवानंद गावडे, चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस, धारगळचे माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका अश्विनी पालयेकर, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेविका राखी कशालकर, नगरसेवक बाप्पा उर्फ विष्णू साळगावकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक मनोज हरमलकर, वझरीच्या माजी सरपंच संगीता गावकर, तोरसे सरपंच प्रार्थना मोठे, वारखंड सरपंच गौरी जोसालकर, कासारवर्णे सरपंच नवनाथ नाईक, सरपंच अनिकेत साळगावकर, माजी सरपंच स्वाती गवंडी, उपसरपंच कल्पिता कलशांवकर, पंच आनुराधा कोरगावकर आदी उपस्थित होते. आमदार आयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी, 14 आणि 15 रोजी पेडणे येथे सरकारी शिमगोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व पेडणेवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हा शिमगोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सरचिटणीस सुबोध महाले यांनी, महोत्सव यशस्वी व्हावा आणि देव देवतांचे आशीर्वाद मिळावे यासाठी श्रीदेवी भगवती आणि श्रीदेवी रवळनाथ यांना नारळ ठेवून शिमगोत्सवाला सुऊवात केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.