वृत्तसंस्था/ लखनौ
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे झालेल्या लखनौ सुपर जायंटस् संघाविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला षटकांची गती राखता आली नाही. त्यामुळे या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला 24 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून दुसऱ्यांदा असा गुन्हा घडल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
या संघातील इम्पॅक्ट खेळाडूंसह अन्य खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. मंगळवारी झालेल्या या सामन्यात लखनौने मुंबईचा 4 गड्यांनी पराभव केला होता. मुंबई इंडियन्स संघाकडून या स्पर्धेत दुसऱ्यांदा असा गुन्हा घडला आहे. संघातील खेळाडूला मिळणाऱ्या मानधन रकमेतील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावे लागेल.