संगणकाशी जोडताच होतो स्फोट
वृत्तसंस्था/ क्यूटो
दक्षिण अमेरिकेतील देश इक्वेडोरमध्ये पत्रकारांना स्फोटक पेनड्राइव्ह पाठविले जात आहे. पत्रकारांनी हा पेनड्राइव्ह स्वतःचा लॅपटॉप किंवा संगणकाशी जोडताच त्यात स्फोट होत आहे. इक्वेडोरपर्यंत 5 हून अधिक पत्रकारांना अशाप्रकारचा स्फोटक पेनड्राइव्ह पाठविण्यात आला आहे. 20 मार्च रोजी इक्वेडोरमधील स्थानिक वृत्तवाहिनी ‘इक्वाविसा’च्या कार्यालयात स्फोट झाला होता. याप्रकरणी तपास केल्यावर पत्रकार लेनिन आर्टिएडा यांना हा पेनड्राइव्ह पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पत्रकाराने हा पेनड्राइन स्वतःच्या लॅपटॉपशी जोडताच स्फोट झाला होता.
पत्रकार लेनिन आर्टिएडा हे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराशी निगडित शोधपत्रकारिकतेसाठी ओळखले जातात. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताची ओळख पटविली आहे. हल्ल्याची अशाप्रकारची पद्धत पहिल्यांदाच पाहिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पेनड्राइव्हमध्ये आरडीएक्सने भरलेला एक कॅप्सूल होता. पेनड्राइव्हमधील आरडीएक्सचाच स्फोट झाला होता, लॅपटॉपला पेनड्राइव्ह कनेक्ट केल्यावर आरडीएक्सला इलेक्ट्रिक चार्ज मिळाल्याने तो सक्रीय होत त्याचा स्फोट झाल्याचे मानले जात आहे.
टीसी, रेडिओ एक्सा आणि टेलीयामाजोनस नाच्या आणखी 3 वाहिनींच्या पत्रकारांना स्फोटक पेनड्राइव्ह मिळाला होता. त्यांनी हा पेनड्राइव्ह संगणकाशी कनेक्ट केला होता, परंतु त्याचा स्फोट झाला नव्हता. तर हे पेनड्राइव्ह संगणकाऐवजी ऍडाप्टरला जोडण्यात आल्याने स्फोट झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
टेलीयामाजोनस वाहिनीचे पत्रकार मिल्टन पेरेज यांना पॅकेजमध्ये पेनड्राइव्हसोबत एक पत्रही मिळाले होते. पेनड्राइव्हमधील माहिती इक्वेडोरमधील राजकीय चळवळ कोरिज्मोविषयी मोठा खुलासा करणार असल्याचे यात नमूद होते. हे पॅकेज इक्वडोरच्या लॉस रियाज शहरातून पोहोचले होते.