नवीन लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मासिक पेन्शन दिली जाते. मात्र अद्यापही बरेच लाभार्थी या पेन्शनपासून वंचित आहेत. अशांनी कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना आणि इतर कारणांमुळे काही लाभार्थ्यांच्या पेन्शन बंद झाल्या आहेत. तर काही लाभार्थ्यांना नवीन पेन्शन सुरु करायच्या आहेत. त्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. दिव्यांग, वयोवृद्ध, तृतीय पंथीय व विधवांना प्रत्येकी मासिक 800 रुपये पेन्शन दिली जाते. शिवाय यामध्ये पारदर्शकता रहावी, यासाठी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पेन्शन जमा केली जाते.
काही नवीन लाभार्थ्यांना पेन्शन अद्याप सुरु झाली नाही. त्यामध्ये विधवा आणि वयोवृद्धांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वयोवृद्ध महिलांची कुचंबणा होत आहे. अशा लाभार्थ्यांनी आधारकार्ड, बँक पास बुक, दोन फोटोंसह संबंधित ग्राम वन किंवा बेळगाव वन कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग, वयोवृद्ध आणि विधवा महिलांची संख्या अधिक आहे. दरवषी 60 वर्षावरील लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्याबरोबर विधवांची दरवषी भर पडत असते. मात्र असे नागरिक पेन्शनपासून वंचित राहतात. अशांनी शासनाकडून मिळणाऱया पेन्शनचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
असोदे (तहसीलदार ग्रेट-2)
पेन्शनपासून वंचित असलेल्या नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करून पेन्शन सुरु करावी, नवीन पेन्शनधारकांनी कागदपत्रांची पूर्तता करून पेन्शनचा लाभ घ्यावा, शासनाकडून आर्थिक आधार म्हणून संबंधित लाभार्थ्यांना मासिक पेन्शन दिली जाते.