नवी दिल्ली
वॉलमार्ट समूहातील डिजिटल पेमेंट फर्म फोन पे आपले मुख्यालय आता भारतात हलवणार आहे. तशी योजना कंपनीची आहे. सध्या ‘फोन पे’ चे मुख्यालय सिंगापूर येथे आहे. फोन पे चा डिजिटल पैसे देवाण-घेवाणीतला वाटा हा सर्वाधिक राहिला आहे. पुढील 3 ते 4 वर्षात कंपनीला व्यवसाय अधिक विस्तारायचा असल्याने मुख्यालय भारतात हलविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.