प्रतिनिधी / बेळगाव
गुलमोहर बागच्यावतीने ‘लाईफ लाईन्स ऑन कॅनव्हास’ असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत 6 बाय 9 फुटांच्या कॅनव्हासवर प्रत्येकांनी आपापल्या हाताचे ठसे उमटवायचे होते.
वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी कला दालनामध्ये आयोजित या उपकमात बेळगावमधील 350 हून अधिक रसिकांनी सहभागी होऊन आपल्या हाताचे ठसे उमटविले आणि त्यातून एक सुंदर अशा रंगीबेरंगी वृक्षाची चित्राकृती तयार झाली.
सदर चित्राकृती बेळगाव विमानतळावर लावण्यात येणार असून त्यासाठी विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी मान्यता दिली आहे. कॅनव्हास मोनालिसा फाईन आर्ट प्रॉडक्ट्सने पुरस्कृत केला होता तर कोक्मयुयो कॅमलिन कंपनीने रंग पुरस्कृत केले.