बेळगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेळगावमध्ये महिलांसाठी ‘पिंक बस’ सुरू करण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने या बससाठी सातत्याने परिवहन मंडळाशी संपर्क साधून पत्रक्यवहार केला होता. तसेच कार्यकर्ते सौरभ सावंत यांनीही परिवहन मंडळाकडे महिलांसाठी बस सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते.
प्रजासत्ताक दिनी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते ध्वज दाखवून बस महिलांच्या सेवेत रुजू करण्यात आली. यावेळी परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नायक, विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी तसेच इनरव्हीलच्या अध्यक्षा शालिनी चौगुले, सचिव पुष्पांजली मुकण्णावर, सदस्या सुनंदा करलिंगण्णावर, निलम गुत्तीकोळी, स्वाती उपाध्ये आदी उपस्थित होत्या. तांत्रिक अधिकारी राधाकृष्ण, डेपो मॅनेजर शिरगुप्पीकर, कामगार कल्याण अधिकारी सत्यनारायण, सुरक्षा अधिकारी बी. डी. गुरीकार आदी उपस्थित होते.
बसचे वेळापत्रक पुढील प्रमाणे…
- सीबीटी-वडगाव सकाळी 8.40 व सायंकाळी 5.15, वडगाव-सीबीटी 9.15 व 5.50.
- सीबीटी-अनगोळ 8.50 व 5.25, अनगोळ-सीबीटी 9.30 व 6 वाजता.
- सीबीटी-मजगाव 8.25 व 5.30 वाजता, मजगाव-सीबीटी 8.50 व 6.05 वाजता.