ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभागात नियुक्त झालेल्या 71 हजार तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी (दि.13) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्तीपत्र देणार आहेत. त्यानंतर या तरुणांना मोदी संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) मंगळवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
पीएम मोदी रोजगार मेळावा हा केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम असून, त्याद्वारे जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याच रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारच्या अनेक विभागांमध्ये निवड झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कर्मयोगी प्रमुख मॉडय़ूलद्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळेल. कर्मयोगी प्रारंभ मॉडय़ूल हा विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन इंडक्शन कोर्स आहे. यामध्ये सरकारी नोकरांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणी नीतिमत्ता, सचोटी आणि मानवी संसाधन धोरणे यांचा समावेश आहे.
अधिक वाचा : आगामी निवडणुकांमध्ये कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवू