डॉ. वसुधाज यागा अँण्ड फिटनेस ॲकॅडमीचा 100 टक्के निकाल
वेंगुर्ले /वार्ताहर-
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 चा `योग शिक्षक पदविका’ परीक्षेचा निकाल दि. 31 जुलै रोजी जाहिर झाला आहे. या परीक्षेत डॉ. वसुधाज योगा अँड फिटनेस अकॅडमीमधून परीक्षेस बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन अॅकॅडमीचा 100 टक्के निकाल आहे. यात वेंगुर्लेतील प्राजक्ता आपटे, दिपाली पालयेकर व रामा पोळजी यांनी प्रथम तीन क्रमांक पटकाविले आहेत.वेंगुर्ले येथील डॉ. वसुधाज योगा अँड फिटनेस अँकॅडमी हि सिंधुदुर्ग योग प्रशिक्षण संस्था संचलित मान्यताप्राप्त अशी शास्त्रोक्त प्रशिक्षण देणारी संस्था आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र, गोवा या राज्यासोबतच संपूर्ण भारत आणि युरोप, अमेरिकेसह अन्य देशातील विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेत आहेत. .