पदयात्रेला 60 दिवस पूर्ण
वृत्तसंस्था/ मेडक
काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेला रविवारी 60 दिवस पूर्ण झाले आहेत. रविवारी तेलंगणात दाखल या पदयात्रेत वरिष्ठ वकील प्रशांत भूषण सामील झाले आहेत. काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवर यात्रेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यात राहुल गांधी यांच्यासोबत प्रशांत भूषण सामील झाल्याचे दिसून येते.
अनुसूचित जातींच्या संघटनासाठी संघर्ष करणारी संघटना मडिगा आरक्षण पोराटा समितीचे (एमआरपीएस) नेते मांडा कृष्ण मडिगा देखील रविवारी सकाळी मेडक जिल्ह्य़ाच्या अल्लादुर्ग येथून यात्रेत सामील झाले आहेत. ही यात्रा आता रविवारी मेडक येथून कामारेड्डी जिल्हय़ाच्या दिशेने पुढे सरकली असल्याचे काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले आहे.