विषाणुजन्य रोगामुळे बळीच्या संख्येत वाढ : जिल्हय़ातील 193 पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लसीकरण मोहीम
प्रतिनिधी /बेळगाव
पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर जीवघेण्या रेबीजबाबत समाजात जागृती व्हावी आणि रेबिजचे बळी कमी होऊन त्यावर एकच औषध उपलब्ध व्हावे, यासाठी 28 सप्टेंबर हा रेबीज दिवस म्हणून आयोजित केला जातो. पशुसंगोपन खात्यामार्फत रेबीज रुग्णांचे प्रमाण शून्य व्हावे म्हणजेच रेबीजचा अटकाव व्हावा, यासाठी दरवषी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून रेबिज रुग्णांचे प्रमाण कमी केले जात आहे.
जिल्हय़ात 28 लाखाहून अधिक पाळीव जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये 77 हजार 801 कुत्री आहेत. दरवषी या सर्व श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जाते. यंदा खात्याने 45 हजार कुत्र्यांना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यापैकी बऱयाच श्वानांना लस दिली गेली आहे. यंदा 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खात्याची धडपड सुरू आहे. जिल्हय़ातील अथणी, चिकोडी, रायबाग, गोकाक, संकेश्वर, मुडलगी, निपाणी, कागवाड, हुक्केरी आदी तालुक्मयांतूनही प्रतिबंधक लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे.
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेबरोबर समाजात रेबीजच्या दुष्परिणामांविषयी जागृतीदेखील निर्माण केली जात आहे. रेबीज या विषाणुजन्य रोगामुळे बळी जाणाऱया नागरिकांची संख्या वाढत आहे. यासाठी खबरदारी म्हणून समाजात जनजागृतीचे कामदेखील केले जात आहे. यंदा जिल्हय़ात ठिकठिकाणी अँटीरेबिज महाप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून जास्तीत जास्त श्वानांना लस टोचण्यात आली आहे.
तालुक्मयात 9 हजार 80 पाळीव कुत्री आहेत. त्यापैकी 8 हजार कुत्र्यांना ही लस देण्यात आली आहे. शिवाय विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून भटक्मया कुत्र्यांनादेखील लस देण्यासाठी खात्याने पुढाकार घेतला आहे. अलीकडे भटक्मया कुत्र्यांनी माणसांवर आणि जनावरांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून भटक्मया कुत्र्यांनादेखील लस टोचली जात आहे.
रेबीजबाबत जनमानसात जागृती करण्यासाठी दि. 1 ते 15 सप्टेंबरदरम्यान रेबीज जागृती पंधरवडा साजरा करण्यात आला. या काळात जिल्हय़ातील शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना व ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करून रेबिजबाबत जागृतीदेखील करण्यात आली.
ग्रामीण भागातही जनजागृती
जिल्हय़ातील 193 लहान-मोठय़ा पशुवैद्यकीय दवाखान्यांतून 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 9 ते 12 यावेळेत सर्व कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जात आहे. निरोगी कुत्र्यांनादेखील ही लस टोचली जात आहे. रेबीज नियंत्रित व्हावा आणि त्याविषयी जनसामान्यात साक्षरता निर्माण व्हावी, यासाठी ग्रामीण भागातदेखील जनजागृती करून प्रतिबंधक लस देण्यात आली.
यंदा तब्बल पंधरा दिवस लसीकरण मोहीम
अलीकडे श्वान पाळणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. जर्मन शेफर्ड, लॅब्रेडोर, डॉबरमन पिन्श्चर, पामेरियन, सायबेरियन हस्की, डच हाऊंड, बेल्जियम शेफर्ड, ग्रेट डेन, गोल्डन रिट्रिव्हर, चिहुआहुआ या विदेशी प्रजातींबरोबरच भारतीय प्रजातीच्या मुधोळ हाऊंडसारख्या श्वानांना लस टोचण्यात आली आहे. यंदा तब्बल पंधरा दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेला श्वानपालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लसीकरण मोहिमेला प्रतिसाद
जिल्हय़ात पंधरा दिवस श्वानांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सर्व जातीच्या कुत्र्यांना लस देण्यात आली. रेबीजचा अटकाव व्हावा आणि तो टाळला जावा, यासाठी ही मोहीम सक्रियपणे राबविण्यात आली. सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांतून याला प्रतिसाद मिळाला.
– डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)
जिल्हय़ातील तालुकानिहाय कुत्र्यांची संख्या
तालुके | कुत्र्यांची संख्या |
अथणी | 10793 |
बैलहोंगल | 2428 |
बेळगाव | 7709 |
चिकोडी | 7870 |
गोकाक | 5646 |
हुक्केरी | 5480 |
कागवाड | 1721 |
खानापूर | 4492 |
कित्तूर | 800 |
मुडलगी | 2568 |
निपाणी | 1758 |
रायबाग | 12145 |
रामदुर्ग | 5950 |
सौंदत्ती | 5544 |
यरगट्टी | 2376 |
एकूण | 77,280 |