सातवीमध्ये म्हाकवेतील अनुष्का पाटील प्रथम
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीत शिरोळ तालुक्यातील तेरवाड शाळेचा पृथ्वीराज सूर्यवंशी १ ९ २ गुण मिळवून प्रथम तर इयत्ता सातवीमध्ये कागल तालुक्यातील म्हाकवे शाळेची अनुष्का पाटील ही विद्यार्थीनी १८८ गुण मिळवून प्रथम आली . शंभर जणांच्या गुणवत्ता यादीत कागल , राधानगरी , भुदरगड , करवीर तालुक्याचे वर्चस्व राहिले .
जि . प . मार्फत स्वनिधीमधून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इयत्ता ४ थी व ७ वी मधील सर्व विद्यार्थ्याची २०० गुणांची प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करणेत आली होती . यासाठी ४४५५ ९ विदयार्थ्याची चाळणी परीक्षा झाली .३८०० विदयाथ्यांची निवड परीक्षेमधून इयत्ता ४ थी व ७ वी तील जिल्हास्तरावर गुणानुक्रमे १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली . जिल्हास्तरावर निवड झालेल्या पहिल्या तीन विदयार्थ्यांना पाच , चार व तीन हजार रुपये व उत्तेजनार्थ सात विदयाथ्र्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये बक्षीस तर तालुकास्तर प्रथम तीन विदयार्थ्यांना प्रत्येकी १५००,१००० व ५०० रुपये बक्षीस , प्रमाणपत्र व चषक दिला जातो . इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जातात . मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण , शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा झाली . परीक्षा समन्वयक म्हणून विस्तार अधिकारी डी.सी. कुंभार व एम . आय . सुतार यांनी काम पाहिले . परीक्षेचे नियोजन उपशिक्षणाधिकारी आर.डी. पाटील , जयश्री जाधव , विस्तार अधिकारी आर . वाय . ठोकळ , गौरव पवार यांनी केले . परीक्षेत यशस्वी पहिल्या दहा विद्यार्थ्यांची नावे- इयत्ता चौथीपरीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांची नावे अनुक्रमे नाव , गाव , तालुका – इयत्ता चौथी – पृथ्वीराज सूर्यवंशी ( तेरवाड , शिरोळ ) नेहा चौगुले ( म्हाकवे , कागल ) राजनील कुदळे ( सरवडे , राधानगरी ) वेदिका येवारे ( माणगाव , हातकणंगले ) तनिष्क चव्हाण ( नृसिंहवाडी , शिरोळ ) सिद्धेश आंबेकर ( कसबा तारळे , राधानगरी ) सृष्टी पताडे ( वाळवे , राधानगरी ) स्वरा नाईक ( शिनोळी , चंदगड ) विराज भारती ( सोनाळी , भुदरगड ) कौमुदी * मतीवाडकर दारवाड भुदरगड ) इयत्ता सातवी अनुष्का पाटील ( म्हाकवे , कागल ) रोहित पाटील ( सुरूपली , कागल ) सायली देवडकर ( म्हाकवे , कागल ) आदर्श शेटके ( म्हाकवे , कागल ) अथर्व गायकवाड ( मोहडे चाफोडी , राधानगरी ) आशिष पाटील ( म्हाकवे , कागल ) सानवी पाटील ( पनोरे , पन्हाळा ) श्रेया पाटील ( सावे शाहूवाडी ) राजवर्धन पाटील ( बेळवले बुद्रुक , कागल ) प्रतीक्षा घेवडे ( बानगे , कागल.