वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर पोलिसांनी राजौरी येथील ड्रग्ज तस्करीतील आरोपीची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये आलिशान घर आणि कारचा समावेश असून त्याची किंमत 1.80 कोटी रूपये आहे. ड्रग्ज तस्कर विकल चोग्गा याच्यावर गेल्यावषी अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावरील आरोपांची शहानिशा झाल्यानंतर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे राजौरीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमृतपाल सिंह यांनी सांगितले. तसेच राज्यात अन्यत्रही अमली पदार्थ विव्रेत्यांवर पोलिसांची कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.