तीन दिवस रसिकांना गायनाची मेजवानी : मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा गौरव
प्रतिनिधी /बेळगाव
पं. बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्या जन्मशताब्दी समारोप समारंभाला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरमध्ये हा तीन दिवस विशेष कार्यक्रम चालणार आहे.
प्रारंभी कडलास्कर बुवा यांच्या ज्ये÷ शिष्यमंडळींतर्फे दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. जयश्री सव्वागुंजी यांच्या यमन रागाने सुरुवात झाली. यावेळी विद्या मगदूम, निर्मला प्रकाश, महेश कुलकर्णी, गीता देशपांडे आदींनी साथ दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा गौरव झाला.
त्यानंतर शास्त्राrय संगीत, भजन, भावगीत व भक्तीगीत सादर झाले. याला उपस्थितांची वाहवा मिळाली. त्याबरोबर ‘तेथे कर आमुचे जुळती’ हा संगीत नाटय़ाविष्कार कार्यक्रम झाला. यामध्ये कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले.
यामध्ये राजप्रभू धोत्रे, महेश कुलकर्णी, योगेश रामदास, प्रसाद शेवडे, श्रावणी शेवडे, कमल कुलकर्णी, दिव्या पळसुले-देसाई आदींचा सहभाग होता. ‘प्रिय पहा’, ‘युवती म्हणा’ ‘या नय नवल’, ‘कर हा करी’, ‘सोहम हर डमरू बाजे’ आदी नाटय़ सादर करून रसिकांची दाद मिळविली.
पुणे, मुंबई, देवरुख, भोपाळ, बंगळूर येथील गायक सहभागी होणार
या तीन दिवशी कार्यक्रमात पुणे, मुंबई, देवरुख, भोपाळ, बंगळूर येथील गायक सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळी शेवटच्या सत्रात पुणे येथील गायिका अनुराधा कुबेर यांचे गायन होणार आहे.
रविवारी दुपारच्या सत्रात मुंबईतील प्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन होणार आहे. त्यानंतर उपस्थित कलाकारांचा सत्कार सोहळा होणार आहे. त्यानंतर मुंबई येथील पं. सुरेश बापट यांचे गायन होणार आहे.