मंत्री राणे , केसरकर काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज सावंतवाडी गांधी चौक येथे जाहीर सभेचे आयोजन दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय मंत्री नारायण राणे ,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान , कालच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत केसरकर आणि राणे ठाकरेंवर काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.