ओटवणे / प्रतिनिधी
खासदार विनायक राऊत यांच्याकडून ८ लाखाचा निधी
सांगेली मधलीवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहीरीसाठी खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतुन ८ लाख रुपये मंजुरी करण्यात आले आहे. त्यामुळे या वाडीच्या पिण्याच्या पाण्यासह उन्हाळ्याच्या अखेरीस भासणारी पाण्याची तीव्र टंचाई दूर होणार आहे.
सांगेली गावातील मधलीवाडीमध्ये सार्वजनिक विहिरीची गरज ओळखून याबाबत खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी याची तात्काळ दखल घेत सार्वजनिक विहीर मंजूर करीत आपला खासदार निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे मधली वाढतील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांचे आभार मानले.यावेळी उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे सावंतवाडी उपतालुका संघटक प्रभाकर राऊळ, सांगेली विभागप्रमुख, सांगेली सोसायटी चेअरमन, सांगेली ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम राऊळ, सांगेली माजी सरपंच रमाकांत राऊळ आदी उपस्थित होते.