प्रतिनिधी /पणजी
ज्येष्ठ साहित्यिक तुळशीदास काणकोणकर यांच्या ‘राधा’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दि. 16 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता खोर्ली मळार इंडस्ट्रियल गेट येथील वनदेवी देवस्थानच्या सभागृहात होणार आहे. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
याचप्रमाणे आरोग्य प्रमुख डॉ. केदार रायकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, तरुण भारतचे राजू भिकारो नाईक आणि देवस्थानचे अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.
बाल साहित्यात मोडणारी ही कादंबरी एका अनाथ मुलीवर आधारित असून तिचे मनोगत या पुस्तकात मांडण्याचा लेखक तुळशीदास काणकोणकर यांनी प्रयत्न पेले आहेत. कला, कविता, निबंध लेखन, नाटक, कादंबरी अशी एकूण बारा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेली आहेत. राधा पुस्तकाला प्रा. अनिल सामंत यांची प्रस्तावना लाभलेली आहे. लेखक, साहित्यप्रेमीनी या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.