वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन (अमेरिका)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सीटी खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत चौथी मानांकित जेसिका पेगुला आणि तृतीय मानांकित इलिना स्विटोलिना यांच्यात एकेरीची उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे.
2019 साली या स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या जेसिका पेगुलाने पेटॉन स्टिर्नसचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. 2023 च्या टेनिस हंगामात पेगुला डब्ल्यूटीए टूरवरील पहिली स्पर्धा जिंकण्यासाठी आतुरलेली आहे. या स्पर्धेत पेगुलाला मानांकनात अग्रस्थान देण्यात आले आहे. हा सामना दीड तास चालला होता.