वेंगुर्ले(भरत सातोस्कर)-
टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने व शिरोडा वेळागर सर्वे. नं. 39 मित्रमंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्गने शिरोडा-वेळागर बीचवर आयोजीत केलेल्या 35 व्या सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बीच रस्सीखेच चॅिम्पयनशिप 2022 स्पर्धेत अंतिम सामन्यात पुरूष गटातून पंजाब संघाने गुजराथ संघावर मात करीत तर महिलांच्या केरळ संघाने हरीयाणा संघावर मात करीत सुवर्ण पदक पटकाविले.शिरोडा-वेळागर येथील बीचवर आयोजीत केलेल्या 35 व्या राष्ट्रीयस्तरावरील सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बीच रस्सीखेच चॅिम्पयनशिप 2022 स्पर्धेत 18 राज्यातील 43 संघातील 660 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सोमवारी पार डलेल्या अंतिम सामन्यात पुरूष संघ 560 किलो वजनी गटांत पंजाब संघाने सुवर्ण पदक, गुजराथ संघाने रौप्यपदक तर अरूणाचल प्रदेश संघाने कास्यपदक पटकाविले. पुरूष संघ 580 किलो वजनी गटांत पंजाब संघाने सुवर्णपदक, केरळ संघाने रौप्यपदक तर हरीयाणा संघाने कास्यपदक पटकाविले, महिला 480 किलो वजनी गटांत केरळ संघाने सुवर्ण, हरीयाणा पॉवर संघाने रौप्य तर गुजराथ संघाने कास्यपदक पटाविले. पुरूष व महिला मिक्स 600 किलो वजती गटांत पंजाब संघाने सुवर्णपदक, हरीयाणा संघाने रौप्य तर गुजराथ संघाने कास्यपदक पटकाविले.राष्ट्रीय रस्सीखेच संघटनेचे सचिव मदन मोहन, महाराट्र राज्य रस्सीखेच्या अध्यक्षा व आशियाई रस्सीखेच्या सचिव माधवीताई पाटील, राज्य सचिव गुपीले, संयोजक जिल्हा रस्सीखेच सघटनेचे अध्यक्ष तथा वेळागर सर्व्हे नं. 39 चे नेते जयप्रकाश चमणकर, ट्रेनिंग हेड एन. के. चक्रवर्ती, निर्णय समिती प्रमुख प्रमोद जोशी आदी प्रमुख मान्यवरांचा समावेश होता.