चंदीगड
हरियाणाने चालू खरीप व्यापारी हंगामात आतापर्यंत 11 लाख टन धान्याची खरेदी केली आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ही माहिती दिली. खट्टर यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, राज्यातील 207 मार्केटमध्ये विविध खरीप पिकांची खरेदी सुलभतेने केली जात आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत मार्केटमध्ये विविध एजन्सींकडून 11 लाख टन धान्याची खरेदी करण्यात आली आहे.