कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या कोल्हापूरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी निवृत्त लेफ्टनंट कर्नल राहुल वैजनाथ माने यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे अलिबाग (जि.रायगड)सह कोल्हापूरचा पदभार अतिरिक्त असणार आहे. ते आज. सोमवारी प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भगवान कांबळे यांच्याकडून पदभार स्विकारणार आहेत.
कोल्हापूरला 2021पासून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नसल्याने हा पदभार उपजिल्हाधिकाऱ्यांकडे होता.अखेर दोन वर्षानंतर राज्य सरकारने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी नियुक्तीचे आदेश काढले. त्यानुसार निवृत्त लेफ्टनंट कर्नल राहुल वैजनाथ माने यांच्याकडे कोल्हापूरचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
निवृत्त लेफ्टनंट कर्नल राहुल वैजनाथ माने हे मुळचे पुण्याचे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षणा सातार येथील सैनिक स्कूल येथून झाले आहे. पुढील शिक्षण नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एनडीए), खडकवासला (जि.पुणे) येथून झाले आहे. 12 जून 2004 मध्ये ते इंडियन मिलिटरी ॲकॅडमी, देहरादून येथे लेफ्टनंट या पदावर ऊजू झाले. त्यानंतर त्यांनी 2019 पर्यंत लष्करात विविध ठिकाणी सेवा बजावली. 2019 मध्ये ते लेफ्टनंट कर्नल या पदावऊन निवृत्त झाले. यानंतर त्यांनी ‘नाबार्ड’ मध्ये दोन वर्षे सेवा बजावली. महिन्यापूर्वी ते अलिबाग येथे जिल्हा सैनि कल्याण अधिकारी म्हणून ऊजु झाले. त्याचबरोबर आता कोल्हापूरचाही अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे.