प्रतिनिधी / बेळगाव :
हिंडलगा-सुळगा रोडवरील अंबिका लॉज ॲण्ड बोर्डिंग छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसाय प्रकरणी चौघांना अटक केली आहे. बेळगाव महिला पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी सोमनाथ गवळी, राहुल पाटील, मयुर पाटील, रमेश तारीहाळ या चौघांना अटक करण्यात आली आहे. महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने लॉजवर छापा टाकून ही कारवाई केली. महिला पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.